
पुणे : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची ‘नासा’ आणि ‘इस्रो’ला पाठविताना परीक्षेमार्फत निवड करण्यात आली. या परीक्षेसाठी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) तयार केलेली प्रश्नावली आता संच स्वरूपात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.