'स्वदेशीचा स्विकार चिनी वस्तुंचा बहिष्कार' या संकल्पनेवर साकारली भव्य रंगावली

Front of SP College pune Protest against China
Front of SP College pune Protest against China

पुणे : गलवान खोऱ्यात शाहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी व पुणेकरांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तूंचा स्विकार करा हा संदेश देत 'स्वदेशीचा स्विकार चिनी वस्तुंचा बहिष्कार' या संकल्पनेवर भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही रांगोळी साकारण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात अली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र. मंडळाचे अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, सतिश पवार, प्रा. दिलीप शेठ, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर, अमोल साठे, संजय सातपुते, सूर्यकांत पाठक, वैभव वाघ, सचिन जामगे, मंदार रांजेकर आणि अमर लांडे उपस्थित होते.
-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
यावेळी पराग ठाकूर म्हणाले, स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापरायला हव्यात, हाच चीन विरोधातील भारतीयांचा लढा असेल. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांची एकजूट आवश्यक आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्याने तीन हजार 800 कोटींचा फटका चीनला बसलाय. त्यामुळे देशभक्त नागरिकांनी स्वदेशीचा स्विकार करावा."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com