एफएसआय वाढणार ; पायभूत सुविधांचे काय ? 

एफएसआय वाढणार ; पायभूत सुविधांचे काय ? 

पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे "एफएसआय' वाढल्यानंतर उंच इमारतींत राहणाऱ्या नागरिकांना पाणी, कचरा-सांडपाणी प्रक्रिया आदी पायाभूत सुविधांचा प्रश्‍न भेडसवण्याची शक्‍यता "स्मार्ट सिटी'मध्ये निर्माण झाली आहे. 

मेट्रो मार्गालगत तसेच एचसीएमटीआरच्या दुतर्फा स्थानकांच्या परिसरात 500 ते 800 मीटर परिसरात चार एफएसआय देण्याची शिफारस महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. मेट्रो मार्गावर किंवा स्थानकांलगत एफएसआय वाढविला तर सध्याच्या लोकसंख्येत किमान 31 लाख नागरिकांची भर पडू शकते. घरांची संख्या वाढल्याने पिण्याचे पाणी, कचरा आणि सांडपाणी प्रक्रिया, आरोग्य, पार्किंग आदी किमान सुविधांचे जाळे वाढविण्यासाठी नेटका आराखडा आवश्‍यक होता. त्यातच मेट्रो मार्गाची या वर्षी डिसेंबरमध्ये चाचणी घेण्याचा मानस जाहीर झाला आहे. परंतु पायाभूत सुविधांबाबत महापालिकेत अद्याप निश्‍चित धोरण तयार झालेले नाही. 

उंच इमारती झाल्यावर मेट्रोच्या परिसरात लोकसंख्येची घनताही वाढणार आहे. त्यासाठी सुविधांची निर्मिती आवश्‍यक असेल. मेट्रो मार्गालगत लहान भूखंडांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी "क्‍लस्टर डेव्हलपमेंट'चे धोरण मंजूर होणे गरजेचे आहे. त्यामुळे एफएसआयचा वापर टप्प्याटप्प्याने सुरू झाल्यावर पायभूत सुविधांचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

पायाभूत सुविधा 
सध्या----------10 वर्षांनी वाढ 
- पिण्याचे पाणी ----1200 एमएलडी - सुमारे 2200 एमएलडी 
- कचरा -------- 1600 टन ------ सुमारे 3200 टन 
- सांडपाणी -----900 एमएलएडी ---सुमारे 1800 एमएलडी 
- वीज - 800 मेगावॅट -------------सुमारे 1600 मेगावॅट 

- या सुविधा वाढवाव्या लागणार 
वाहनतळ, मेट्रोला पूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दवाखाने, क्रीडांगणे, उद्याने, भाजी मंडई, 


चार एफएसआय देणेच चुकीचे आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येतो. सध्याच पुरेशा सुविधा मिळत नसताना वाढीव एफएसआय कशासाठी? जरी एफएसआय दिला तरी पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करून त्याचा समावेश शहराच्या विकास आराखड्यात करायला हवा. त्यानुसार महापालिकेने सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. 
- सुलक्षणा महाजन, नगर रचनातज्ज्ञ 

बांधकाम व्यावसायिक किंवा पुनर्विकासाचा व्यवसाय वेगात व्हावा, यासाठी चार एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्ताच वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्‍न पडला आहे. त्यात आणखी बांधकाम झाले, नवे लोक राहायला आले तर, हा प्रश्‍न गंभीर होणार आहे. आधी पायाभूत सुविधा निर्माण करा, मगच एफएसआय द्या. 
अजित सांगळे, उपाध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन 

चार एफएसआय दिल्यावर घरांची संख्या वाढेल. पण, वाहतुकीचा प्रश्‍न कसा सोडविणार ? रस्ते रुंद झालेले नाहीत. प्यायला पुरेसे पाणी मिळत नाही. मग कसे करायचे ? महापालिकेने आधी सुविधा निर्माण करा, मगच एफएसआयच्या निर्णयाची अंमलजावणी करावी. 
मिलिंद वालवडकर, रहिवासी 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com