नव्वद पैशांनी इंधन महागले

नव्वद पैशांनी इंधन महागले
Published on

हेड
नव्वद पैशांनी
इंधन महागले

सबहेड
पेट्रोल, डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १९ ः पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून आठवडाभरातील ही दुसरी दरवाढ ठरली आहे. पेट्रोलच्या दरात सुमारे ९० पैशांनी, तर डिझेलच्या दरातही जवळपास तितकीच वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मागील शुक्रवारी (ता. १५) पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर तीन रुपयांची वाढ केली होती. यामुळे सरकारी तेल कंपन्यांचा दैनंदिन तोटा एक हजार कोटी रुपयांवरून ७५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः वाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर याचा परिणाम होऊ शकतो. या दरवाढीवर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. पक्षाच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेडा म्हणाले की,‘‘ निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर इंधन दरवाढ होईल असे आम्ही आधीच सांगितले होते. त्यावेळी असा कोणताही विचार किंवा हेतू नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. आता सरकारचा हेतू बघा.’’
......
राज्यातील प्रमुख
शहरांत इंधनाचे दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com