इंधन दरवाढीचा वेग मंदावला मात्र, दरवाढ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मागील महिन्याभराचा विचार करता गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर अत्यल्प प्रमाणात वाढले आहेत. 22 जूनला पेट्रोल 86.06 रुपये प्रति लिटर होते. ते आज 86.89 रुपये आहे. तर 75.79 रुपये प्रति लिटर असणारे डिझेल आता 77.35 वर जाऊन पोहोचले आहे. पेट्रोलच्या तुलनेत या आठ दिवसांत डिझेलची किंमत 1.56 रुपयांनी तर पेट्रोल 83 पैशांनी वाढले आहे. 

पुणे : गेल्या महिन्याभरापासून सुसाट सुटलेल्या इंधन दरवाढीचा वेग गेल्या आठ दिवसांत काहीसा मंदावला आहे. मात्र धीम्या गतीने का होईना दरवाढ अजूनही सुरूच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील महिन्याभराचा विचार करता गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर अत्यल्प प्रमाणात वाढले आहेत. 22 जूनला पेट्रोल 86.06 रुपये प्रति लिटर होते. ते आज 86.89 रुपये आहे. तर 75.79 रुपये प्रति लिटर असणारे डिझेल आता 77.35 वर जाऊन पोहोचले आहे. पेट्रोलच्या तुलनेत या आठ दिवसांत डिझेलची किंमत 1.56 रुपयांनी तर पेट्रोल 83 पैशांनी वाढले आहे. गेल्या आठवड्यात केवळ 24 जून रोजी पेट्रोलच्या दरात वाढ झाली नाही. मात्र इतर दिवशी दररोज ही किंमत वाढतच आहे. आज शहरात पेट्रोलचा दर 86.89 रुपये तर डिझेलचे दर 77.75 रुपये  आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले, "देशात इंधनाची मागणी एकदम वाढली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र गेल्या आठवड्याभरात दर मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्याचा विचार करता या आठवड्यात दर आणखी स्थिर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एक जूनपासून आजपर्यंत पेट्रोलची किंमत 08.08 तर डिझेल 10.36 रुपयांनी वाढली आहे.

पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर विचित्र अपघातात 2 ठार; वाहतूक विस्कळीत

गेल्या आठ दिवसांत वाढलेले दर
डिझेल - 1.56 रुपये 
पेट्रोल - 83 पैसे

गेल्या आठ दिवसांतील दर : 
22 जून
पेट्रोल 86.06
डिझेल 75.79

23 जून
पेट्रोल 86.24
डिझेल 76.30

24 जून 
पेट्रोल 86.24
डिझेल 76.75

25 जून
पेट्रोल 86.40
डिझेल 76.87

26 जून
पेट्रोल 86.60
डिझेल 77.03

27 जून
पेट्रोल 86.84
डिझेल 77.23

29 जून
पेट्रोल 86.89
डिझेल 77.35


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel price increase rate has slowed down but slow rise is still going on