इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

बिबवेवाडी - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. 

बिबवेवाडी - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. 

या वेळी केंद्र सरकारविरोधात अच्छे दिनच्या उपहासात्मक घोषणा देत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा व दुचाकी जाळण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राकेश कामठे, संतोष नांगरे, गणेश मोहिते, अमोल ननावरे, सचिन शिंगवी, मृणालिनी वाणी, श्वेता होणराव, विकास वाघे, विपुल म्हैसूरकर, नीलेश नवलाखा, अन्वर शेख, नरेंद्र इंगवले, आकाश चिंचवले, अमित बामगुडे, दीपक जाधव आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fuel rate oppose agitation by congress