इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग

इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) भोसरी आगार इंधनबचतीसाठी वेगवेगळे प्रयोग राबवीत आहे. त्यात कमी उत्पन्नाचे मार्ग बंद करणे, टॅंकरमधील डिझेल पूर्णपणे काढून घेणे, धूप न होण्यासाठी पंपावर छत उभारणे व बसचालकांना मार्गदर्शन करण्यासह आदींचा समावेश आहे. यामुळे गेल्या सहा महिन्यांत दरमहा साधारणतः पाचशे लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली.

पीएमपीच्या भोसरीतील सद्‌गुरुनगर आगारातील सर्व म्हणजे ५३ बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. त्यातील साधारणतः ४५ ते ४८ बस नियमित मार्गावर असतात. आगारातील डिझेल पंप हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून कार्यान्वित आहे. मात्र, कंपनीकडून येणारे आणि प्रत्यक्षात वापरले जाणारे डिझेल यात मोठी तफावत आढळत होती. त्यामुळे पीएमपीचे नुकसान व्हायचे. त्यावर उपाययोजना म्हणून आगाराने वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करून सप्टेंबर २०१८ पासून इंधनबचतीवर भर दिला आहे. 

असे होताहेत प्रयोग
डिझेल टॅंकर आगारात आल्यानंतर शेडमध्ये एक तास उभे केले जाते. त्यामुळे डिझेल स्थिर होऊन उन्हामुळे धूप कमी होते. टॅंकरची डेनसिटी तपासून डिझेल बरोबर आल्याची खात्री केली जाते. टॅंकर मागे, पुढे किंवा तिरपा करून सर्व डिझेल काढून घेतले जाते. यामुळे महिन्याच्या शेवटी येणाऱ्या डिझेलच्या कमी-जादा खपावर नियंत्रण ठेवले आहे. बसच्या इंजिनात दुरुस्ती केल्याने चालकांना बस सतत चालू ठेवावी लागत नाही. सिग्नल थांबल्यानंतर बस चालू ठेवू नये, बसस्टॉपवर बस बंद करावी, अशा सूचना व मार्गदर्शन चालकांना दिल्या आहेत. बसच्या डिझेल टॅंकची झाकणे सुस्थितीत ठेवली आहेत.

धूप व अन्य कारणांमुळे दरमहा अडीचशे लिटरपर्यंतची डिझेलची तूट पीएमपीने गृहीत धरली आहे. मात्र, अनेकदा हजार लिटरपर्यंत तूट येत होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी सहा महिन्यांपासून डिझेलबचतीवर भर दिला. त्याबाबत केलेल्या सूचनांचे बसचालक व पंपावरील कर्मचाऱ्यांकडून पालन होत असल्याने दरमहा डिझेल तुटीचे प्रमाण घटले आहे. 
- शांताराम वाघेरे, आगारप्रमुख, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com