esakal | अटलबिहारी वायपेयींची इच्छा पूर्ण करा - डॉ. रघुनाथ माशेलकर
sakal

बोलून बातमी शोधा

बालगंधर्व रंगमंदिर - संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) सिद्धार्थ शिरोळे, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, वैशाली माशेलकर, डॉ. माशेलकर, फडणवीस

‘पुण्यात २०००मध्ये भरलेल्या सायन्स काँग्रेसला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यावेळी मी भाषणात माझ्या शाळेतील भावे गुरुजींचे उदाहरण दिले होते. उपस्थित असलेल्या नोबेल लॉरिएट शास्त्रज्ञांनी असे भावे गुरुजी आम्हाला लाभले नसल्याची खंत व्यक्त केली होती. तो धागा पकडून वाजपेयींनी मला म्हणाले होते, ‘‘माशेलकर आज असे भावे गुरुजी मिळत नाहीत; कारण शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जात नाही.

अटलबिहारी वायपेयींची इच्छा पूर्ण करा - डॉ. रघुनाथ माशेलकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘पुण्यात २०००मध्ये भरलेल्या सायन्स काँग्रेसला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यावेळी मी भाषणात माझ्या शाळेतील भावे गुरुजींचे उदाहरण दिले होते. उपस्थित असलेल्या नोबेल लॉरिएट शास्त्रज्ञांनी असे भावे गुरुजी आम्हाला लाभले नसल्याची खंत व्यक्त केली होती. तो धागा पकडून वाजपेयींनी मला म्हणाले होते, ‘‘माशेलकर आज असे भावे गुरुजी मिळत नाहीत; कारण शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जात नाही. ती पुन्हा मिळायला हवी’’, नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने वाजपेयींची ही अपुरी राहिलेली इच्छा  पूर्ण करावी’’, असा सल्ला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.

निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ वितरण समारंभाचे. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आयोजक महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, वैशाली माशेलकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘अटलजी केवळ व्यक्ती नसून महान विचार आणि संस्था आहे. विज्ञान व तंत्रज्ञानावर अटत्यांचे विशेष प्रेम होते. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ यास पुढे जय विज्ञानाची जोड दिली. विज्ञान व तंत्रज्ञानासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के गुंतवणूक करू असेही ते म्हणाले होते. पण त्यानंतर फार कमी काळ ते सत्तेत होते. अजूनही आपण हे ध्येय गाठू शकलो नाही.’’ मुंबई महापालिकेच्या मराठी शाळेतून शिकलेल्या डॉ. माशेलकर यांनी मराठीतून शिकल्याने माझे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले.  

Video: चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी कोल्हापूरला जाणार!'

फडणवीस  म्हणाले, ‘‘लोकसंख्या ही आपल्या देशाची समस्या नाही, तर खजिना आहे, हे माशेलकरांनी ओळखले. त्यातूनच त्यांनी युवाशक्तीला प्रेरणा देण्याचे काम केले. राज्यात आम्ही सरकारमध्ये असताना ‘इनोव्हेशन सोसायटी’ची संकल्पना मांडली, त्यातून माशेलकर समितीच्या अहवालानुसार देशातील पहिले स्टार्टअप धोरण आणले. त्यासाठी तरुणांना अर्थसाहाय्य केले. गेल्या चार वर्षात राज्यात स्टार्टअपमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली. माशेलकर हे केवळ रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ नाहीत, तर त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग सामान्य माणसासाठी केला आहे.’’

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी; गुन्हा दाखल

कोल्हापूरला परत जाणार - पाटील
कोल्हापूरवरून येऊन पुण्यात आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कायमच विरोधकांचे लक्ष ठरतात. मात्र, त्यांनी आता ‘मी कोल्हापूरला परत जाणार असून याबाबत विरोधकांना सांगा,’ असे भर बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात जाहीर केले आहे. 

पाटील म्हणाले, ‘‘गिरीश बापट यांनी डॉ. माशेलकर हे आमचे आहेत, असा क्‍लेम केला. पण पुणे खरच असे आहे की प्रत्येकाला इथे सेटेल व्हावे, सर्वार्थाने प्रगत व्हावे असेच वाटते,’’ असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्याच वेळी ‘मी पुण्यात राहणार नाही, देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या विरोधकांना सांगून टाका,’ असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.

Edited By - Prashant Patil

loading image