कष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न मिळावे यासाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांच्या पुढाकाराने दत्त प्रज्ञा संस्थेतर्फे महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्राचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी महात्मा फुले मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अन्नछत्र संकल्पना मांडणारे धवल आपटे, नगरसेवक गायत्री खडके, विष्णू हरिहर, जयवंत मानकर आदी उपस्थित होते. 

शहरात एकूण 11 अन्नछत्र असून दररोज दुपारी 12 ते 3 यावेळात 20 रुपयांमध्ये जेवण तर सकाळी 9 ते 11 यावेळात नाष्टा दिला जातो. आपटे म्हणाले, आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे पुण्यात येणाऱ्या अनेकांना एकवेळच्या जेवणाची घडी बसविणेही अवघड जाते. याची जाणीव झाल्यामुळे हा उपक्रम हाती घेतला. 

''मंडईत येणाऱ्या कष्टकरी माणसाला कमी पैशात चांगले अन्न मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील काळामध्ये शहराच्या विविध ठिकाणी अशी अन्नछत्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे.''
- दिलीप काळोखे, माजी नगरसेवक

Web Title: The a full meal for the laborers will be available in 20 rupees In foodbank