राष्ट्रवादी, शिवसेनेच्या प्रभागामध्ये निधी वर्ग

NCP-Shivsena
NCP-Shivsena

पुणे - भाजपला सत्तेबाहेर ठेवून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मात्र, पुणे महापालिकेत भाजपच्या एका नगरसेवकाने प्रभागातील सव्वादोन कोटींचा निधी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात वळविला. या नव्या ‘युती’ची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. 

दरम्यान, प्रभागांतील सगळी कामे झाली आहेत. त्यामुळे निधी वाया जाईल, या शक्‍यतेने तो अन्य प्रभागांत वळविला आहे, असे भाजपच्या नगरसेवकाने स्पष्ट केले. नगर रस्ता परिसरातून महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मधून हा नगरसेवक निवडून आला आहे. त्याने ‘सह’ यादीतील पाच कोटींपैकी दोन कोटी २० लाखांचे वर्गीकरण केले. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाच्या प्रभागासाठी (क्र. ३७-क) एक कोटी, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने प्रभाग (क्र.३८-ड) सूचविलेल्या कामांसाठी एक कोटी २० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भातील वर्गीकरणाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ती अंतिम मंजुरीसाठी ते सर्वसाधारण सभेपुढे ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com