भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे मावसभाऊ आश्वात नायर यांनी मुखाग्नी दिला. 

पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे मावसभाऊ आश्वात नायर यांनी मुखाग्नी दिला. 

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर शहीद झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी आत्मबलिदान करणाऱ्या अधिकाऱ्याला हजारो पुणेकरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर मूळचे केरळचे असलेले नायर पुण्याच्या खडकवासला येथे राहत होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारो तरुण गोळा झाले आहेत. ''मेजर नायर झिंदाबाद'', ''अमर रहे, अमर रहे, शशी नायर अमर रहे'' आशा घोषणा दिल्या जात आहेत.

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी नायर यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुण्यात आणण्यात आला. घोरपडी येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे त्यांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल एन. एस. लांबा यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर लष्करी अधिकारी, सैनिक व नायर कुटुंबीय तसेच नागरिकांनीही त्यांना आदरांजली वाहिली. पत्नी तृप्ती या आजारी असल्याने खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हीलचेअरवरूनच या ठिकाणी आणण्यात आले होते. 

नायर यांचे मूळ गाव केरळ राज्यातील एर्णाकुलम जिल्ह्यामधील चेंगामनाड हे आहे. ते गेल्या ३० वर्षांपासून येथे राहतात. त्यांचे वडील नोकरीनिमित्त खडकवासला येथे आले. केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेत ते रोखपाल होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांची आई लता या गृहिणी आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव तृप्ती असून, त्या संगणक अभियंता आहेत. काही दिवसांपासून त्यांना दिव्यांगत्व आले आहे. बहीण सीना या पदवीधर आहेत.<नायर हे ४० दिवसांची सुटी संपवून, ३ जानेवारीला ते सीमेवर रुजू झाले होते. नायर यांचा जन्म खडकवासला येथे १९८५ मध्ये झाला. येथील केंद्रीय विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एनसीसीत भाग घेतला. तेथे त्यांना उत्कृष्ट स्नातक म्हणून गौरविले होते. पदवीनंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) मधून प्रशिक्षण पूर्ण केले. १० डिसेंबर २००७ रोजी ते सैन्यात दाखल झाले होते. पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. 
 

Web Title: Funeral For Martyr Major Shashidharan Nayar In Pune