बिष्णोई टोळीतील तिघांना उत्तराखंड येथून अटक

बिष्णोई टोळीतील तिघांना उत्तराखंड येथून अटक
Published on

पिंपरी, ता. २० : रावेत येथील फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याप्रकरणी बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गॅंगच्या तिघांना उत्तराखंड येथून अटक करण्यात आली. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केली. दोन कोटींच्या खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रवीण रामनिवास (२३, बेरी, झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप राठी (२१, काकराना, रोहतक, हरियाणा), सागर अजय पाल (२१, सोनपत, हरियाणा) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या टोळीने ‘ए जे’ फर्निचर मॉलच्या मालकांकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी १५ मेच्या रात्री फर्निचर मॉलवर गोळीबार केला. आरोपींनी आठ गोळ्या झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेंतर बिष्णोई गॅंगने घटनेची जबाबदारी घेतल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. दरम्यान, पोलिसांनी पकडण्याआधी आरोपींनी फेसबुक पोस्ट करत धमकीदेखील दिली होती. यात बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याच्या अकाउंटला ‘टॅग’ करण्यात आले होते.

अशी केली अटक...
गोळीबारानंतर आरोपी पसार झाले होते. त्यांचा तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाआधारे माग काढला. पोलिसांनी इंदूर, चंदीगड, रोहतक आणि हरिद्वार येथे पाठलाग केला. उत्तराखंड येथे एका लॉजमध्ये आरोपी लपल्याची माहिती मिळताच पथकाने त्यांना अटक केली. त्यांना बुधवारी रात्री विमानाने पुणे येथे आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com