भारताचे भवितव्य उज्ज्वल - डॉ. विजय केळकर

The future of India is bright, said the former Union Finance Secretary Dr. Vijay Kelkar
The future of India is bright, said the former Union Finance Secretary Dr. Vijay Kelkar

पुणे - ‘‘देशाची अर्थव्यवस्था सध्या काही अडचणींचा सामना करीत असली, तरी भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे,’’ असे मत अर्थतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय अर्थसचिव डॉ. विजय केळकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्‍लब ऑफ पुणे साउथने डॉ. केळकर यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले, त्या प्रसंगी ते बोलत होते. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रताप पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी क्‍लबचे अध्यक्ष अभिजित जोग आणि अनिल सुपनेकर यांनी डॉ. केळकर यांची मुलाखत घेतली. केलेले करार निश्‍चितपणे पाळणे, कायद्याची बूज राखणे, हे अर्थव्यवस्था उभारणीसाठी आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन डॉ. केळकर यांनी केले.

भारतासारख्या देशाने न्यूझीलंड किंवा चीनची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या स्पर्धेत उभे राहण्याचा आत्मविश्‍वास आपण बाळगला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अटलबिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत बजावलेल्या कामगिरीचा डॉ. केळकर यांनी गौरवाने उल्लेख केला. शासकीय कारभाराचा दर्जा, हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमधील अडसर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

पवार यांनी अध्यक्षीय भाषणात रोटरीच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व डॉ. केळकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान, ज्ञानी व मूल्यांवर निष्ठा असलेल्या व्यक्तीची सन्माननीय सदस्यत्वासाठी केलेली निवड अत्यंत योग्य असल्याचे सांगितले. जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. गीतांजली पुरोहित यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com