लिथियम बॅटरीचे भविष्य धोक्‍यात

lithium-battery
lithium-battery

पुणे - कमी वजन आणि ऊर्जा साठवण्याच्या जास्त क्षमतेमुळे ‘लिथियम-आयन’ बॅटरीने ऊर्जा संचयन क्षेत्रात क्रांती केली. त्याबद्दल तिच्या संशोधकांना २०१९ मध्ये नोबेलही मिळाले. पृथ्वीवर दुर्मीळ असलेला ‘लिथियम’ धातू आणि विजेवर चालणाऱ्या ई-वाहनांच्या वाढत्या उत्पादनामुळे या बॅटरीच्या भविष्यालाही मर्यादा आल्या आहेत, असे मत शास्त्रज्ञ प्रा. वैद्यनाथन रामनाथन यांनी व्यक्त केले.

बाणेर रस्ता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. मागील वर्षाचे रसायनशास्त्रातील नोबेल ‘लिथियम-आयन’ बॅटरीचे निर्माते अकिरा योशिनो, स्टेनली व्हेटिंगम आणि जॉन गुडइनफ यांना घोषित झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आयसर’च्या सायन्स क्‍लबने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. लिथियम आयन बॅटरीमुळे वाहन क्षेत्रात क्रांती झाली. या बॅटरीची सुरक्षितता, कमी वजन, मोठ्या प्रमाणावर विजेची साठवणूक आणि सहज चार्जिंग; तसेच पर्यावरणपूरकतेमुळे ई-वाहनांच्या उत्पादनाला जगभरात मोठी चालना मिळाली; परंतु पृथ्वीवर फक्त ०.०१ टक्के लिथियम उपलब्ध असून, मागणीमुळे ते लवकरच संपुष्टात येईल, असे डॉ. वैद्यनाथन म्हणाले. 

बॅटरीतील लिथियमच्या पुनर्वापराची पद्धत अजूनही शास्त्रज्ञ शोधू शकले नाहीत. त्यासाठी अमेरिकन सरकारने २०० अब्ज डॉलर संशोधनावर खर्च केले आहेत. मुबलक प्रमाणावर उपलब्ध असलेल्या धातूच्या बॅटरींची कार्यक्षमता आणि उपयोजितता वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. 
- प्रा. वैद्यनाथन रामनाथन, शास्त्रज्ञ, आयसर

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

  अत्यंत ज्वलनशील धातू
  लिथियम बॅटरीची १४० स्पेसिफिक कॅपिसिटी
  दक्षिण अमेरिका, चीन, बॉव्हीलिया या 
    देशामध्ये आढळतो
  मोबाईल, ई-वाहने, संगणक आदींमध्ये वापर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com