भावी गुणवंत इंजिनीअरनी घेतला इतर राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश; कारण वाचा

ब्रिजमोहन पाटील
Monday, 30 November 2020

'जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती, पण मला हवी असलेली ब्रांच मिळत नसल्याने, मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची परीक्षा दिली. त्यात मला मेकॅनिकल ब्रांच मिळाली, त्यामुळे तेथे प्रवेश घेतला आहे. सीईटीसाठी अर्ज भरला होता, ही परीक्षा होण्यापुर्वीच मणिपाल इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश झाला होता, अन्यथा मी सीईटी देखील दिली असती,' असे अमेय वैद्य सांगत होता. याच प्रमाणे राज्यातील अनेक भावी गुणवंत इंजिनीअरने इतर राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे.

पुणे - 'जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती, पण मला हवी असलेली ब्रांच मिळत नसल्याने, मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची परीक्षा दिली. त्यात मला मेकॅनिकल ब्रांच मिळाली, त्यामुळे तेथे प्रवेश घेतला आहे. सीईटीसाठी अर्ज भरला होता, ही परीक्षा होण्यापुर्वीच मणिपाल इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश झाला होता, अन्यथा मी सीईटी देखील दिली असती,' असे अमेय वैद्य सांगत होता. याच प्रमाणे राज्यातील अनेक भावी गुणवंत इंजिनीअरने इतर राज्यातील संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात साधारणपणे ३६५ इंजिनिअरींग महाविद्यालये असून, तेथे १ लाख ३५ हजार विद्यार्थांची प्रवेश क्षमता आहे. पण दरवर्षी जवळपास ४५ ते ५० टक्के जागा रिकाम्या रहात आहेत. तरीही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता राखणार्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागलेली असते. 

'कोरोना'मुळे २०२०-२१ या वर्षातील शैक्षणिक वर्ष कोलमडून गेले आहे. पण महाराष्ट्रात 'एमएचटी-सीईटी' परीक्षा होण्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन्स, ॲडव्हान्स या परीक्षा झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक गुणवंतांनी आयआयटी, एनआयटी अशा प्रतिष्ठीत संस्थेत प्रवेश मिळाला. ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी गुण मिळाल्याने या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा मनासारखी ब्रांच मिळाली नाही म्हणून प्रवेश न घेतलेल्या हुशार विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांनी त्यांच्याकडे आकर्षित केले आहे.

आपत्तीच्या प्रसंगी पुणेकरांचा वृत्तपत्रांवर सर्वाधिक विश्‍वास

महाराष्ट्रात सीईटी परीक्षा लवकर घेतली असती आणि त्यांचा निकालही लवकर जाहीर झाला असता तर हुशार मुलांनी राज्यातील प्रतिष्ठीत महमहाविद्यालयात प्रवेश घेतला असता. सीईटी परीक्षेच्या वारंवार बदलणार्या तारखा आणी निकाल लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले नुकसान नको म्हणून ज्या खासगी विद्यापीठात संधी आहे, तेथे प्रवेश घेतला आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. शामकांत देशमुख म्हणाले, "उशीरा सीईटी होण्यामुळे विद्यार्थांनी राज्याबाहेरील संस्थेत प्रवेश घेतला आहे, पण खर्च न परवडणार्या विद्यार्थ्यांनी सीईटीला प्राधान्य दिले.

'स्क्रीनशिवाय घरच्या घरी शिक्षण' उपक्रमात तीन हजार विद्यार्थी सहभागी

'सीओईपी'ची क्रेझ कायम
एकीकडे खासगी विद्यापीठात लाखो रुपयांचे शुल्क भरून विद्यार्थी जात असताना दुसरीकडे 'सीओईपी'ची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले. सीईटीमध्ये १०० पर्सेंटाइल घेणारा सौरभ जोग, ९९.९९ पर्सेंटाइल घेणारा क्षितिज साळुंके, ९९.९७ पर्सेंटाइल घेणारा यश कुलकर्णी यांनीही सीओईपी'लाच प्रवेश घेणार असे सांगितले. 'आम्ही खासगी विद्यापीठांमध्ये देखील प्रवेशाची चाचपणी केली,  तेथे प्राधान्य न देती यशने 'सीईटी'वर लक्ष केंद्रित केले. त्यात उत्तम गुण मिळाले असल्याने सीओईपी'मध्ये प्रवेश घेणार आहे, असे यशचे वडील राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.

उद्योग- व्यवसायही सावरले !

'पुण्यातील पालक विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यात विद्यार्थ्यांना पाठविण्यात तयार नसतात. पण आता विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील आयआयटी, एनआयटी सारख्या संस्थांमध्ये संधी मिळत असेल तर त्यांनी नक्कीच प्रवेश घेतला पाहिजे. चांगला ट्रेंड निर्माण होत आहे. उलट याचे स्वागत झाले पाहिजे."
- संदीप देवधर, संस्थापक संचालक, देवधर्स अकॅडमी आॅफ एक्सलन्स (डीएई)

'सीईटी सेलने परीक्षा घेण्यास व त्यात निकाल लावण्यास बराच उशीर केला आहे.  त्यामुळे या काळात परराज्यातील खासगी विद्यापीठामधील इंजिनिअरींग महाविद्यालयांना प्रवेश घेऊन टाकले आहेत. लवकर निकाल लागला असता तर या गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतला असता. सीईटी केले यात सुधारणा केली पाहिजे."
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Future meritorious engineers took admission in institutions in other states