आपत्तीच्या प्रसंगी पुणेकरांचा वृत्तपत्रांवर सर्वाधिक विश्‍वास

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे - आपत्तीच्या प्रसंगी पुणेकरांचा वृत्तपत्रांवर सर्वाधिक विश्‍वास असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रांनी अधिक विश्‍लेषणात्मक मजकूर देण्याची अपेक्षाही वाचकांनी व्यक्त केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या माजी प्राध्यापक आणि सध्या सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या पीएच.डी. संशोधक दिपान्निता दास यांनी हे सर्वेक्षण केले आहे. सप्टेंबर २०१९च्या २६ तारखेला पुणे शहरात तब्बल १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी २५० वर्ष जुना कात्रज तलाव ओसांडून वाहू लागला आणि आंबिल ओढ्याला महापूर आला होता. मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले तर, काहींची घरेच उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी पुणेकरांनी तातडीचा माहिती स्रोत म्हणून ऑनलाइन माध्यमांचा वापर केला, तर विश्‍वासार्ह माहितीसाठी वृत्तपत्रांचा आधार घेतल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येते. त्याचबरोबर घटनेच्या परिपूर्ण वृत्तांकनामध्ये वृत्तपत्रे कमी पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

सर्वेक्षणाचे निष्कर्ष  

  • पुराचे कारण, भविष्यातील उपाययोजना, दुर्घटनेमागील कारणे, वातावरण बदल, माहिती आधारित बातम्या, अतिक्रमणे आदींशी निगडित माहिती नागरिकांनी वृत्तपत्रांत तपासली.
  • ताज्या घडामोडींबरोबरच जनजागृतीचे परिणामकारक माध्यम म्हणून पत्रकारितेकडे बघितले जाते. 
  • वृत्तांकनात पत्रकारांनी उत्तम कार्य केले. परंतु, वृत्तपत्रांची रोजची मर्यादा, कामाची ‘डेड लाइन’ आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही लोकहिताच्या बातम्यांकडे दुर्लक्ष झाल्याची लोकांची भावना.

आपत्तीच्या काळात माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या वेळी माध्यमांनी त्यांची भूमिका कशी पार पाडली, माध्यमे आणि महापालिकेमध्ये समन्वय होता का? अशा सर्व प्रश्‍नांचा सर्वांगाने आढावा घेण्याचा प्रयत्न याद्वारे केला आहे. वृत्तपत्रांनी आता विश्‍लेषणात्मक बातमीदारीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
- दिपान्निता दास, माध्यम संशोधक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com