हडपसरमध्ये ग. दि. माडगूळकरांचे स्मारक व्हावे

संदिप जगदाळे
शुक्रवार, 25 मे 2018

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील म्युनसिपल पर्पजसाठी आरक्षित जागेवर कै. ग. दि. माडगूळकर स्मारक व उद्यान विकसित करण्यात यावे यायासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी याबाबत नगरसेवक योगेश ससाणे यांनी नगरसचिव कार्यालय, महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला आहे. 

हडपसर : रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील म्युनसिपल पर्पजसाठी आरक्षित जागेवर कै. ग. दि. माडगूळकर स्मारक व उद्यान विकसित करण्यात यावे यायासाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी याबाबत नगरसेवक योगेश ससाणे यांनी नगरसचिव कार्यालय, महापालिका आयुक्त आणि स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला आहे. 

ससाणे म्हणाले, वाकडेवाडी येथे मुळा नदीकाठी कै. ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक व उद्यान प्रस्तावित आहे. यासाठी महापालिकेने सन २००८-२००९ च्या अंदाजपत्रकात २ कोटी ७१ लाख रूपयांची तरतूद देखील केली. यासाठी ४७५ मी लांबीची संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यास दोन कोटी ३८ लाख खर्च करण्यात आला. त्यानंतर सन २०१२-१३ च्या अंदाजपत्रकात २० लक्ष व सन २०१३-१४ मध्ये २ कोटी तरतूद करण्यात आली होती.

ग. दि. माडगूळकर यांच्या नियोजीत स्मारकास ४९५५० चौ. मी. जागा आवश्यक असून त्यापैकी सुमारे १५२५० चौ. मी. जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे. सदर ताब्यात असलेल्या जागेपैकी ३७५० चौ. मी. जागेवर मैलापाणी शुध्दीकरण केंद्र आहे. २८०० चौ. मी जागा खासगी मालकीची व उर्वरीत ३१५०० चौ. मी.जागा विविध शासकीय विभागांच्या मालकीची आहे. २८०० चौ. मी. शासकीय जागा ताब्यात घेणेकामी महापालिकेने सातत्याने पत्रव्यव्हार व पाठपुरावा केलेला असून अदयाप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या स्मारकाचे व उदयानाचे काम मार्गी लागू शकलेले नाही. 

१ अक्टोबर २०१८ रोजी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्ष काळात ग. दि. माडगूळकर स्मारक व उदयान प्रकल्प मार्गी लागल्यास त्यांना ख-या अर्थाने अदरांजली ठरेल. त्यामुळे हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील स. न. ९५  येथील ५४३७१.४८ चौ. मी. जागा म्युनसिपल पर्पजकरीता महापालिकेच्या ताब्यात आहे. या जागेवर स्मारक व उदयानासाठी जागा ताब्यात असल्याने महापालिकेला जागा ताब्यात घेण्यासाठी खर्च येणार नाही व हे काम वेळेत मार्गी लागेल. 

वाकडेवाडी येथील नियोजीत स्मारकाची जागा ही नदीलगत असल्याने जागा हस्तांतरित करण्यापूर्वी रेडलाईन, ब्लूलाईन बाबत पाटबंधारे विभागाकडून खातरजमा करणे आवश्यक आहे. हरित लवाद यांचे विविध नदीलगतच्या विकसनाबाबतचे नियम, अटी व निकाल पाहता सदर जागेवर प्रस्तावित ग. दि. माडगूळकर यांच्ये स्मारक व उद्यान अडचणीचे होत आहे. त्यामुळे हडपसर येथे ग. दि. माडगूळकरांचे स्मारक करावे अशी मागणी ससाणे यांनी केली आहे. 

Web Title: g d madagulkar museum to be built in hadapsar