गदिमांच्या स्मारकास मुहूर्त कधी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - ‘बरीच वर्षे झाली गदिमांचे स्मारक अद्यापही पुण्यात का होत नाही? गदिमांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुण्यात महापालिकेला गदिमांच्या स्मारकाचे वावडे का?... ११ ते १२ वर्षांत दीड ते दोन कोटी रुपये खर्च करूनही केवळ सीमाभिंत उभारल्या जातात, पण स्मारकाची एकही वीट उभी राहू नये, ही खेदजनक बाब आहे. १ ऑक्‍टोबर २०१८ रोजी गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. तोपर्यंत तरी स्मारकाचे काम महापालिकेने पूर्ण करावे,’’ अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा नदीकाठाजवळील (वाकडेवाडीजवळ) माधवराव शिंदे उद्यानालगत असलेली जमीन प्रसिद्ध साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी निश्‍चित केली होती. एवढ्या वर्षांत पालिकेने येथे पुरापासून बचावासाठी फक्त सीमाभिंत बांधली आहे. मात्र स्मारकाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी सुमित्र यांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि आताचे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची स्मारक व्हावे यासाठी भेट घेतली होती. त्यांनी स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण दोन वर्षांनंतरही काम रखडलेले आहे. आता पालिका आयुक्त झाल्यानंतर राव हे स्मारकाचे काम पूर्ण करतील का, असा सवालही सुमित्र यांनी उपस्थित केला आहे.

गदिमांचे स्मारक व्हावे, यासाठी आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडून आश्‍वासनही मिळाले होते. आता ते महापालिका आयुक्त झाले आहेत. आतातरी त्यांनी हा स्मारकाचा विषय मार्गी लावावा. 
- सुनील महाजन, अध्यक्ष, नाट्य परिषद (कोथरूड विभाग) 

Web Title: gadima Monument muhurt