गाडीतळ चौकातील कोंडी लवकरच फुटणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

हडपसर - दिवसरात्र शेकडो वाहनांच्या गराड्यात सापडणारा गाडीतळ चौक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी पोलिस आणि पीएमपी प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्यांना काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. या चौकातील वाहतूक प्रश्नांविषयी ‘सकाळ’मधून वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

या चौकातील बंद वाहतूक नियंत्रक दिवे सुरू केले आहेत. तसेच प्रदीप ट्रेडर्स येथील बसथांबा कृष्ण छाया हॉटेल शेजारी स्थलांतरित केला आहे. पुलाखालील रिक्षा स्टॅंड व हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे.  बसथांबा स्थलांतरित केल्याने व सिग्नल सुरू झाल्याने प्रवाशी व वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाने व वाहतूक विभागाचे कर्मचारी नियुक्त केले आहेत.

थांब्यावर लवकरच निवारा
पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, की नागरिकांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील. स्थलांतरित बसथांब्यावर निवारा करण्यात येईल. तसेच अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित विभाग कारवाई करेल. गाडीतळ येथून पुढे स्थलांतरित केलेल्या बस - मनपा भवन (१११), शिवाजीनगर (१८०), चिंचवड (२०४), १३९ (निगडी), १८७ (घोरपडी-पुणे स्टेशन), २०३ (पुणे स्टेशन), २०१ (आळंदी), २०७ (सासवड-स्वारगेट)

या चौकात वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक पोलिस, पीएमपी व महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.
-संजय गाढवे, नागरिक 

चौकात सिग्नल लागल्याने वाहतुकीची कोंडी कमी होऊन ती सुरळीत झाली आहे. लवकरच बीआरटीतून पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल बसविण्यात येईल. 
- जे. डी. कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा 

Web Title: gadital chowk traffic