

Summary
हा वाद शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दुचाकी काढण्यावरून झाला होता.
मुख्य आरोपी गजा मारणे तुरुंगात असून रुपेश त्याची टोळी चालवत होता.
घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये फेब्रुवारीमध्ये शिवजयंती दिवशी अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करुन फरार झालेल्या गजा मारणे टोळीचा सदस्य रुपेश मारणे याला कोथरुड पोलिसांनी मुळशीतील आंदगावमधून अटक केली आहे. गजा मारणे तुरुंगात असल्याने रुपेश टोळीची सर्व सुत्रे चालवायचा.