गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पठण

रमणबाग - न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रविवारी श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास या संस्थेतर्फे आयोजित श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करताना भाविक.
रमणबाग - न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रविवारी श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास या संस्थेतर्फे आयोजित श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करताना भाविक.

पुणे - आळंदी कार्तिक वारीनिमित्त सद्‌गुरू गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पठणाचा सोहळा रविवारी उत्साहात झाला. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास या संस्थेने आयोजित केलेल्या या पारायण सोहळ्यात १८०० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता. या वेळी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उज्जैनचे डॉ. विठ्ठल पागे यांना श्री गजानन महाराज सेवाधारी भूषण पुरस्काराने गौगवण्यात आले. स्वामी माधवानंद ऊर्फ डॉ. माधव नगरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम अकरा हजार रुपये व गजानन महाराजांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या वेळी माधुरी पागे, संस्थेचे अध्यक्ष मदन कस्तुरे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
पारायण सोहळ्यादरम्यान लायन्स क्‍लब ऑफ पुणे-सहकारनगर यांच्या वतीने महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व जनजागृतीचे आयोजन केले होते. १०० हून अधिक महिलांनी या वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com