
पुणे- ती श्रीलंकेतील हत्तींच्या अनाथालयात गेली आणि तिथल्या "लक्ष्मी' हत्तीणीशी नातं जोडून परतली. तिच्या अन्न व औषधोपचारांसाठी गेले वर्षभर गंधाली कुलकर्णी पुण्याहून खर्च पाठवते. लक्ष्मीची ख्यालीखुशाली तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारते. तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ स्नेह्यांना दाखवताना हरखून जाते.
गंधाली कुलकर्णी असे तरुणीचे नाव आहे. ती माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपनीत परदेशी भाषाविषयक काम करते. भटक्या कुत्री-मांजरींना अन्नपाणी पुरवणं, त्यांचं लसीकरण, नसबंदी व औषधोपचारांची व्यवस्था करणं हा तिचा छंद. जखमी पक्षी-प्राणी सापडल्यास त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ती धडपडते. गेल्या वर्षी ती श्रीलंकेत गेली. तेथील हत्तींच्या अनाथालयातील "लक्ष्मी' नावाच्या हत्तीणीशी तिची मैत्री झाली.
पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय; आजचा आकडा ऐकाल तर धक्का बसेल!
गंधाली म्हणाली, ""लक्ष्मी माझ्याच वयाएवढी आहे, हे कळल्यावर मला गंमत वाटली. सर्कशीत हत्तींना कराव्या लागणाऱ्या कसरती, हस्तिदंतासाठी तस्करांकडून होणारी शिकार, माणूस व वन्यजीव यांच्यातील संघर्षामुळे हत्तींचे होणारे हाल, पैशांसाठी त्यांना घेऊन गावोगावी फिरणाऱ्यांकडून होणारा छळ, पाय किंवा गळ्यात अडकवले जाणारे साखळदंड, माहुताकडून टोचल्या जाणाऱ्या अंकुशाचा धाक वगैरेंतून या राजबिंड्या प्राण्याची सुटका व्हावी, असं तीव्रतेने वाटलं. त्या अनाथालयातील कोणत्याही हत्तीचा खाणं आणि औषधांचा खर्च, काही काळापुरता घेणार का, अशी विचारणा होताच मी लक्ष्मीच्या सहा महिन्यांसाठीच्या खर्चाची रक्कम जमा करूनच परतले. नुकतंच संबंधितांनी तो कालावधी संपल्याचं कळवला. मी स्वतः किंवा आणखी कुणाची मदत पुढच्या काळासाठी मिळेल का, ही चौकशी केली. मी पुढील सहा महिन्यांसाठीचीही रक्कम पाठवली. लक्ष्मीची तात्पुरती पालक होण्याचा आनंद वेगळाच आहे.''
पर्यावरणाच्या जबाबदारीचं भान
गंधाली असेही म्हणाली, ""भारतातही अशी अनाथालय आहेत. लोकांनी तिथे जाऊन हत्तींच्या सहवासाचा अनुभव घ्यावा. त्यांना खायला घालणं, अंघोळ घालणं, त्यांच्यासमवेत झाडांमधून फिरणं यातली मौज निराळीच असते. त्यामुळे बहुतेकांची काही स्वरूपात खर्च उचलायची इच्छा होते. मी वर्षभरासाठी मिळून दहा हजार रुपयांची मदत केली. मला तेथील मंडळी हत्तींच्या लीदेपासून तयार केलेल्या जाड कागदाची शुभेच्छापत्र पाठवतात; तसेच आकर्षक वस्तूही विक्रीसाठीही असतात. एकूणच हे नातं मला विलक्षण समाधान देणारं ठरलं आहे. याने मला पर्यावरणासंबंधीच्या जबाबदारीचं नवं भान दिलं.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.