विसर्जनाऐवजी मूर्ती दान करा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

तळेगाव दाभाडे  - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती दान कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी केले आहे. यासाठी गाव व स्टेशन विभागवार प्रत्येकी पाच मूर्ती संकलन केंद्र व विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याच्या हौदाची सोय नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सेवाभावी संस्था व पर्यावरणप्रेमी यांनी यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.

गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध सेवाभावी संस्था, नगरसेवक व अधिकारी असे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सभागृह नेते सुशील सैंदाणे, नगरसेवक संग्राम काकडे, अमोल शेटे, अरुण भेगडे, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, विलास काळोखे, महेश महाजन, विश्‍वनाथ मराठे, डॉ. गणेश सोरटे, संजय निकाळजे, दिनेश कुलकर्णी आदी रोटरी क्‍लब, इनरव्हील क्‍लब, फ्रेंड्‌स ऑफ नेचर, स्मायलिंग हार्ट, निसर्गराजा या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शहराचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष विलास काळोखे यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने नागरिकांनी गणेशमूर्तींचे विहीर अथवा तळ्यामध्ये विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आले. मूर्तीदान करावी, असे सुचविले आहे, मूर्ती दान करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी मूर्ती संकलन व विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था गाव व स्टेशन येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये गाव विभागात बनेश्‍वर मंदिर, मारुती मंदिर, गोपाळे गुरुजी यांच्या घराशेजारी, गोपाळ परदेशी यांच्या घराशेजारी; तर स्टेशन विभागात यशवंतनगर येथील गोल ग्राउंड, तळ्याजवळ, आंबी पूल, कातवी पूल, कातवी रस्ता, वतननगर आदी ठिकाणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शहरातून सुमारे अडीच हजारांहून अधिक मूर्तींचे दान झाले होते.

Web Title: ganesh festival 2017 talegaon ganesh ustav ganesh visarjan