पुणेकरांनो गणेशोत्सवासाठी पोलिसांनी जाहीर केली आचारसंहिता 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करणे, आरोग्यविषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहीरातींना प्राधान्य देणे अशा प्रकारची आचारसंहिता यंदाच्या गणेशोत्सवासाठी असणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा होत असलेल्या गणेशोत्सवाला उत्सवाचे स्वरुप न देता साधेपणाने साजरा करण्यावर मंडळांनी व नागरीकांनी भर द्यावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. गणेश मूर्ती खरेदीपासून ते विसर्जनापर्यंत गर्दी टाळणे, मिरवणूक न काढणे, प्रत्यक्षात दर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देणे, सुरक्षित अंतर राखणे, सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करणे, आरोग्यविषयक व सामाजिक संदेश देणाऱ्या जाहीरातींना प्राधान्य देणे अशा प्रकारची आचारसंहिता यंदाच्या गणेशोत्सवासाठी असणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने मागील सहा महिन्यांत धार्मिक, सामाजिक व उद्योग व्यवहारामध्ये बंधने लादली होती. त्याचे पालनही करण्यात आले. आता गणेशोत्सवातही शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नागरीकांनी व गणेशोत्सव मंडळांनी त्याचे पालन करण्याची गरज असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. ‘सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत शहरातील गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यावरच नागरीकांनी भर द्यावा. तसेच पोलिस व महापालिका प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे,’ असेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​

वाचा पोलिसांची गणेशोत्सवासाठीची आचारसंहिता 

  • गणेश मूर्ती खरेदी
  • गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी
  • यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही
  • शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी 
  • श्री गणेश आगमन

आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये
आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी 

श्री गणेश प्रतिष्ठापना

  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी
  • अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी
  • सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी 

श्री गणेश पूजा
आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये
सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेश दर्शन
दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा
ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत
दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे
कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये 

पुणे : मंदिर नसलेल्या गणेश मंडळांचा प्रश्‍न निकाली

सुरक्षा
संशयित किंवा बेवारस वस्तू आढळून आल्यास ताबडतोब पोलिसांना खबर द्यावी. मौल्यवान दागिने असणाऱ्या मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी. श्रीच्या मूर्तीचे रक्षणाकरीता कमीत कमी पाच कार्यकर्ते अथवा खासगी सुरक्षा रक्षक 24 तास हजार असावेत 
 
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. व्यक्तींमध्ये कमीत कमी संपर्क यावा याची खबरदारी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अटी व नियमांचे काटेखोर पालन करावे. गणेश मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सेतू ऍप वापरणे बंधणकारक आहे. 

पोलिस मदतीसाठी संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्ष - 100/26126296/26122880
वाहतूक नियंत्रण कक्ष – 26685000
विशेष शाखा नियंत्रण कक्ष -26208286


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2020 pune police rules