
पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी आणि उत्सव काळात लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने सराफ पेढीलादेखील झळाळी आली आहे. गणपतीसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शहरातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग, सदाशिव पेठ या परिसरातील बाजारपेठांमध्ये चांदीचे दागिने घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.