
पुणे : येत्या बुधवारपासून (ता. २७) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीचा आज शेवटचा रविवार असल्याने लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, लोकमान्य टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बुधवार पेठ, रविवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उसळली. नागरिकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसून आला.