
पुणे : गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणेश मंडळांनी मांडव उभारणीचे काम सुरू केले आहे. पण अजूनही महापालिका प्रशासनाला शहरातील रस्ते दुरुस्त करणे, खड्डे बुजविणे, पादचारी मार्ग दुरुस्त करण्याच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव तरी पुणेकरांसाठी सुखकर जाणार, की खड्ड्यांमध्ये अन् खराब पादचारी मार्गांवर चालण्याचा ‘जिवंत देखावा’ अनुभवावा लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.