
पुणे : टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एका मंडळापुढे दोन ढोल-ताशा पथके, जेधे चौक व पूरम चौकात ढोल-ताशा व डीजे वाजविण्यास बंदी आणि दुर्घटना टाळण्यासाठी विक्रेत्यांची मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यावर व्यवस्था, अशा उपाययोजनांवर यंदा भर देण्याचा निर्णय पोलिस व गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. या उपाययोजनांद्वारे टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजता संपविण्याचे टिळक रस्ता विसर्जन मिरवणूक समितीने निश्चित केले आहे.