
पुणे : ‘‘जी २० परिषदेवेळी ज्याप्रमाणे शहरात विद्युत रोषणाई, स्वच्छता आणि रस्त्यांची डागडुजी करून सुशोभीकरण केले होते. त्याच धर्तीवर गणेशोत्सवात विद्युत रोषणाईसह उपाययोजना करण्याचे ठरले आहे,’’ अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी गुरुवारी दिली. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मध्यवर्ती भागात भुयारी मार्ग उभारणीला प्राधान्य दिले जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.