esakal | अवघा अानंदु रे
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव

गेल्या आठ-दहा दिवसांपासून सजलेल्या बाजारपेठांमुळे गणेशोत्सवाची लगबग शहरात दिसत होती. गणेश मंडळांनी मंडपांची उभारणी करून तर, घरोघरी सजावट करून भाविकांनी लाडक्‍या गणरायचे सोमवारी मोठ्या उत्सहात स्वागत केले. काहींनी रविवारी सायंकाळीचे गणेश मूर्तींना घरी नेले होते.

अवघा अानंदु रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : धोतर, कुर्ता, डोक्‍यावर टोपी, कपाळी गंध, किन्‌ किन्‌णारी घंटी आणि मुखाने "गणपती बाप्पाऽ मोरयाऽऽ, मंगलमूर्तीऽ मोरयाऽऽ' असा जयघोष करीत लाडक्‍या गणरायाला घराघरांत विराजमान करणारे भाविक सोमवारी (ता. 2) चिंचवडमध्ये बघायला मिळाले. सकाळपासून दुपारपर्यंत संपूर्ण शहरात असेच वातावरण होते. सायंकाळी ताशांचा तर्रर्र आवाज आणि ढोलांचे ठेके ऐकू येऊ लागले. आकर्षक पद्धतीने सजवलेले रथ दिसले. कारण, गणेश मंडळांनी मिरवणूक काढून लाडक्‍या बाप्पाला विधिवत विराजमान केले. बच्चे कंपनीसह मोठ्यांचाही उत्साह होता. मोदकांचा नैवेद्य दाखवून आणि "सुखकर्ता, दुखहर्ता' आरतीची आळवणी करून आनंदपर्वाची सुरवात झाली. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून सजलेल्या बाजारपेठांमुळे गणेशोत्सवाची लगबग शहरात दिसत होती. गणेश मंडळांनी मंडपांची उभारणी करून तर, घरोघरी सजावट करून भाविकांनी लाडक्‍या गणरायचे सोमवारी मोठ्या उत्सहात स्वागत केले. काहींनी रविवारी सायंकाळीचे गणेश मूर्तींना घरी नेले होते. काहींनी सोमवारी सकाळपासूनच गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे गर्दी केली होती. दुपारी बारानंतर मंडळांनी तयारी सुरू केली. फुलांच्या आकर्षक रथातून काहींनी मिरवणूक काढली. मुहूर्तावर प्रतिष्ठापना केली. चिंचवड, पिंपरी, भोसरी ही गावठाणे व बाजारपेठांसह उपनगरांमधील वातावरण भक्तिमय झाले आहे. 

घरोघरी बाप्पाची स्वारी 
सोमवारी दुपारी साडेबारापर्यंत गणपती प्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त होता. तो साधण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. बच्चे कंपनीसह ज्येष्ठांचा उत्साह दांडगा होता. कोणी दोन्ही हातात पाठावर घेऊन बाप्पाला घरी घेऊन गेले, तर कोणी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर केला. भाव मात्र, गणरायाच्या स्वागताचा होता. "गणपती बाप्पा मोरयाचा...', जयजय कार सुरू होता. घराघरांत विधिवत पूजा करून मोदक, पेढे, पंचामृताचा नैवेद्य दाखवून बाप्पांना विराजमान केले. 

बाप्पाचा जयघोष 

जुनी सांगवी : येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. मंडळांच्या बाप्पांची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जयघोष, घंटानाद आणि मंत्रपुष्पांजली अशा वातावरणात लाडक्‍या गणरायाचे घरोघरी स्वागत झाले. संपूर्ण परिसरात सकाळपासूनच लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होती. घरगुती बाप्पाची मुहूर्त साधून प्रतिष्ठापना केली. बच्चे कंपनीने "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला होता. भक्तांनी पुणेरी पगडी व धोतर, अशी वेशभूषा परिधान केली होती. 
 

loading image
go to top