Ganeshotsav 2020 : पुणेकरांनो, मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या!

Ganesh-Festival-Pune
Ganesh-Festival-Pune

Ganesh Festival : पुणे : यंदा कोरोनाचे सावट पाहता सर्वच उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. पुण्यात गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा यंदा कोरोनामुळे खंडीत झाली असली तरी पुणेकरांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला. तसेच मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांनी देखील यंदा साधेपणाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करत नवा आदर्श निर्माण केला. 

'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने करण्यात आली तसे आता विसर्जन देखील अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विसर्जन मिरवणूक निघणार नाही. त्याऐवजी उत्सव मंडप आणि मंदिर परिसरातच बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील आणि त्यानंतर सकाळी ११.३० वाजता कसबा गणपतीचे विसर्जन होईल. त्यानंतर श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता, श्री गुरुजी तालीम गणपतीचे दुपारी १ वाजता होईल. श्री तुळशीबाग गणपतीचे विसर्जन दुपारी १.४५ वाजता, केसरी वाडा गणपतीचे दुपारी २.३० वाजता विसर्जन होणार आहे. मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन दुपारी २.३० पर्यंत केले जाणार आहे.

तसेच श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सूर्यास्ताच्या वेळी तर अखिल मंडई मंडळाच्या गणपतीचे सायंकाळी ७ वाजता विसर्जन होणार आहे.

दरम्यान, यावेळी गणेशभक्तांना मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गणेशभक्तांना घरी बसून विविध वृत्तवाहिन्या तसेच ऑनलाइन माध्यमांवर विसर्जन सोहळा पाहता येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com