saswad
saswad

गणोशोत्सवात डिजेसह गुलाल, फटाकेबंदी पाळा : पोलिस अधिक्षक पखाले

सासवड (पुणे) : गणोशोत्सवात पावित्र्य राखून डीजेबंदीसह गुलाल व फटाकेबंदी पाळावी. तसेच लोकवर्गणीचा काही भाग सामाजिक उपक्रमावर वापरावा. असंस्कृत प्रकाराला थारा देऊ नये. चांगले काम करणाऱया मंडळांना त्यातूनच गणराया अॅवार्ड यंदा देणार असल्याचे बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक डाॅ. संदीप पखाले यांनी सासवड येथे सांगितले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात पोलिस यंत्रणेने भोर, वेल्हे, सासवड, जेजुरी, राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत आगामी गणेशोत्सव, मोहरम व एकुणच सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तंटामुक्त समिती पदाधिकारी, शांतता समिती, पोलीस पाटील, गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस मित्र, पत्रकार, नागरीक आदींची बैठक घेतली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. संदीप पखाले बोलत होते. यावेळी भोरचे पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, राजगडचे सुनिल गोडसे, भोरचे पांडुरंग सुतार, जेजुरीचे अंकुश माने, राजेश पवार, तसेच सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक आदी उपस्थित होते. 

लोकांच्या इच्छेनं मिळणाऱया वर्गणीचा अंदाज बांधूनच उत्सवातील खर्च नियोजन करा. अगोदरच खर्च निश्चित करुन सक्तीची वसूली करताल तर खंडणीचे गुन्हे दाखल होतील., असा इशारा देऊन डाॅ. पखाले म्हणाले., वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी, उत्सवासाठी पोलीस परवानगी, स्थानिक स्वराज्य संस्था परवानगी पाहीली जाणार आहे. याच काळात मोहरम येत असल्याने खरे तर साऱयांनीच काळजी घ्यावी. मुख्याधिकारी जळक म्हणाले, सासवडचे कऱहा नदीपात्र गाळ काढल्याने खोल झाले, तिथे विसर्जनाच्या वेळी काळजी घ्यावी. कार्यक्रमात निरीक्षक संतोष गिरीगोसावींनी सूत्रसंचालन केले. सुनिल गोडसेंनी आभार मानले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com