Ganesh Kale’s Brother Datta Kale Linked to Andekar Gang
esakal
पुण्यात आयुष कोमकर प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळे असं त्याचं नाव आहे. दोन दुचाकीवरवरून आलेल्या ४ तरुणांनी त्याच्यावर गोळ्या झाडत त्याची हत्याची केली आहे. तसेच त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्लाही करण्यात आला आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. गणेश काळेचा खून सूड बुद्धीने झाल्याची माहितीही आहे. या घटनेनंतर गणेश काळे नेमका कोण आहे? त्याची हत्या नेमकी कशी झाली? अशी चर्चा सध्या सुरु आहे.