

ganesh kale murder case
esakal
कोंढवा परिसरात काल (१ नोव्हेंबर) घडलेल्या गणेश काळे याच्या हत्येचा थेट संबंध आंदेकर टोळीशी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही हत्या टोळी युद्धातूनच घडल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. मयत गणेश काळे यांच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गँगस्टर बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह एकूण नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघे मुख्य आरोपी अटकेत असून, दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.