गणेश मंडळांना आवाहन

गणेश मंडळांना आवाहन
Published on

धर्मादाय कार्यालयाकडून
गणेश मंडळांना आवाहन

सातारा, ता. २७ : जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देणगी अथवा वर्गणी जमा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीसाठी मंडळांनी www.charity.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सातारा विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस. एस. मांजरेकर यांनी केले आहे.
परवानगीशिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास कायद्याचे कलम ६६ व ६७ नुसार फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. संस्था नोंदणी अधिनियम, १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अन्वये नोंद असलेल्या व ज्यांच्या उद्देशामध्ये गणेश उत्सव साजरा करणे असा उल्लेख असणाऱ्या संस्थांना अशी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, तसेच तात्पुरत्या स्वरूपातील परवानगीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवीन परवानगीसाठी अर्ज करताना त्या त्या क्षेत्रातील नगरसेवक, ग्रामपंचायतीकडील त्यांचे या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमती पत्रक देणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव परवानगीचे आवश्यक अर्ज व आवश्यक माहिती पीडीएफ स्वरूपात या कार्यालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. २०२६ मधील तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी देण्याचे काम एक ते १४ सप्टेंबर कालावधीत या कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तरी संबंधित मंडळांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा राजधानी टॉवर्स, तिसरा मजला, यादोगोपाळ पेठ, सातारा या कार्यालयाशी संपर्क साधावा.
..........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com