

Leopard shoot-at-sight order issued by Ganesh Naik in Pune
Sakal
टाकळी हाजी : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे वनमंत्री नाईक यांनी भेट देऊन बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले शिवन्या बोंबे, भागुबाई थोरात आणि रोहन बोंबे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. गेल्या महिन्यात घडलेल्याया दुर्दैवी घटनेनंतर वनखात्याच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला होता. “वनमंत्री गावात आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे घेण्यात आले.