पोखरकर यांच्या कलाकृतीची सातसमुद्रापार कीर्ती

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

मंचर (पुणे) : पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील प्रसिद्ध चित्रकार गणेश दत्तात्रय पोखरकर (वय 30) यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन सात दिवस मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत या कलादालनात पार पडले. चौदा कलाकृती पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी झाली होती. त्यांच्या चित्रांची खरेदी लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीत झाली असून, त्यांची कलाकृती सात समुद्रापार गेली आहे.

मुंबई येथील प्रफुल्ल डहाणुकर आर्ट फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कलानंद आर्टस कॉन्टेस्ट 2018 मध्ये सादर केलेल्या कलाकृतीची दखल घेऊन त्यांना देश पातळीवरील मानाचा समजला जाणारा ‘जहांगीर सबावाला पुरस्कार’ देवून त्यांना मार्च महिन्यात गौरवण्यात आले होते. एक लाख रुपयांचा धनादेश व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पोखरकर यांनी सहा बाय सहा फुट आकाराचे सीटी स्केप हि 14 तैलरंग साकारलेले आहेत. जयपूर, पॅरिस, बँगलोर व मुंबई पुणे शहराची कलाकृती आहे. उंचावरून शहरे नजरेला कशी दिसतात हा चित्राचा विषय आहे. या चित्रासाठी त्यांना चार वर्षाचा कालावधी लागला. ब्रशने रंग न लावता नाईपच्या (चमचा) सहाय्याने रंग लावलेला आहे. बांद्रा रेल्वे स्टेशन उंचावरून कसे दिसते हि कलाकृती कॅलीफोरनिया येथील कलाप्रेमींनी खरेदी केली. तसेच यमन (अरब देश) व देशातील कलाप्रेमिनी कलाकृती खरेदी केल्या.

सिटाडेल्स ऑफ डिझायर या कलाकृती प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते झाले. यावेळी गॅलरी 7 मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रा सचदेव, मुंबई येथील जयजय स्कूल ऑफ आर्टचे प्रमुख विश्वनाथ साबळे होते.

Web Title: ganesh pokhkars artwork and presentation