सुई दो-याने आयुष्याला दिले नवे वळण

talour
talour

टाकवे बुद्रुक - वयाच्या आठव्या वर्षी त्याने हातात सुई दोरा घेतला आणि धाग्याने सुंदर आयुष्य गुंफले. केवळ स्वत:च्या आयुष्याला त्याने दो-याचे टाके घातले नाही, तर इतरांच्या आयुष्याला देखील या सुई दो-याने आधार दिला. गणेश रोहमारे आणि विष्णू खैरे या दोघाही गुरू शिष्याच्या नात्याची शिवण घट्टपणे विणली आहे. परिस्थितीवर मात करत दोघे शिवणकामाचा वापर चरितार्थासाठी करत आहेत.

गणेश रोहमारे आणि विष्णू खैरे दोघेही अपंगच, दोन वेगवेगळ्या मुलखातील एक शिर्डीच्या पोहेगावचा तर दुसरा भूम उस्मानाबादचा. गुरू शिष्यांचे नातं कान्हेतील, साईबाबा सेवाधामच्या चार भिंतीत जुळले. पोलिओ त्यांना बालवयात जखडून गेला. गणेशला वयाच्या दुसर्‍या वर्षी पोलिओची लागण झाली. अपंगत्नाने रांगत, खरडत किंवा सरपटत चालायचा. पाचव्या वर्षी त्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या व्यंगावर लहानगी हसली, त्यांच्या अपंगत्वेवर हस्यकल्लोळ उडला. आणि त्याने घरचा रस्ता धरला. रांगत पुढे जाण्यासाठी त्याची धडपड होती. 

त्याचे चुलते भाऊसाहेब रोहमारे यांनी गणेशला वयाच्या आठव्या वर्षी शासकीय अपंग बालगृहात पहिली इयत्तेत प्रवेश मिळवला. तेथेच गणेशने हातात सुई दोरा घेतला आणि काजे बटण करायला सुरूवात केली. या बालगृहानंतर शिक्षणासाठी आणे जुन्नर, वानवडी पुणे असा प्रवास सुरू झाला. पहिलीत हातात आलेल्या सुई दो-याने आठवीत येई पर्यत गणेशला शिवणकामातील सगळे धडे शिकवले. पॅन्ट, शर्ट, पेटीकोट, ब्लाऊज, पंजाबी ड्रेस, झबले, टोपटे शिवण्यात तो पटाईत झाला. कान्हेत सोसायटी फॉर एज्युकेशन ऑफ क्रिप्लड या अपंग बांधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेत तो शिवणकाम शिक्षक म्हणून रूजू झाला. तत्पूर्वी त्याच्या पायाला सळीबूट मिळाले होते. त्यामुळे कुबड्याच्या आधारावर त्याचे चालणे सुरू होते. वयाच्या सतराव्या वर्षी तो शिक्षक झाला. संघर्ष करवा लागत होता. आर्थिक चणचण होती. तानाजी मराठे यांचे सातत्याने मदत असते. गणेश मराठे यांच्या मदतीने वराळे येथे कपडे शिवून देण्याची टपरी सुरू केली. हाताने चाक फिरायचे तसे नशीबही वेगाने फिरत होते. डोळ्यात स्वप्न होते, काहीतरी करून दाखवण्याची धडपड होती. साईबाबा सेवाधाम येथे गणेश शिकवलेले दोनशेहून अधिक अपंग विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर शिवणकाम व्यवसाय करीत आहेत.

२७ फेब्रुवारी २००० साली नूतन यांच्याशी त्याचा विवाह झाला, २००३ला ओम हे अपत्य जन्मले. ओम आज दहावीत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आहे. २००६ला विष्णू खैरे असाच रांगत, सरपटत, खरडत शाळेत आला. आणि विष्णूला भूतकाळ आठवला. डोळे पाण्याने डबडबले. विष्णूची आई ती ही सावत्र, त्यात हा अपंग घरची परिस्थिती हलाखीची व नाजूक विष्णूला सोसायटी फॉर एज्युकेशन ऑफ पिपल या संस्थेने आधार दिला. त्याचे गुरू होते. विष्णू रोहमारे त्यांनी या शिष्याला सगळे धडे द्यायला सुरुवात केली. तो हस्तकलेत परांगत झाला. पॅन्ट, शर्ट, ब्लाऊज, पेटीकोट, झबले, टोपडे शिवू लागला. दोघांचे वय वाढत होते आणि नातंही घट्ट झाले होते. हे नातं होतं कुटुंबातील सदस्याचे, मित्राचे आणि गुरू शिष्याचे. पाहता पाहता दिवस पालटले. सरपटत चालणारे गुरू शिष्य दुचाकीवरून धावू लागले. यासाठी अनेकांनी विशेषत वराळेतील ग्रामस्थ, तरुणांनी साथ दिली. विष्णू मामा म्हणून ते गावात लोकप्रिय आहे. गावात स्वत:ताचे घर आहे. विष्णू मोठा झाला २०१६ ला त्याचे लग्न कामशेतच्या विद्या शिंदे यांच्याशी झाले. मयंक नावाचा सुंदर मुलगा आहे. 

कामशेतच्या विद्या शिंदे यांच्याशी झाले. मयंक नावाचा सुंदर मुलगा आहे. भीकेची याचना करणारे, भीक मागणारे अपयशाने खचून जाऊन नैराश्य आलेले, आत्महत्येचा वाटेवर निघालेल्या डोळस समाजासाठी गुरू शिष्याच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com