
औंध : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विसर्जन घाटांवर प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेण्यात आला. सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, उपअभियंता दीपक लांडे, कनिष्ठ अभियंता त्र्यंबक भागवत आणि रमेश सानप आदी अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.