
Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे : ध्वनिवर्धकांवर थिरकणारी तरुणाई... गुलालाची मुक्त उधळण... ठेका धरायला लावणारा ढोल-ताशाचा गजर... अन् ‘मंगलमूर्ती मोरयाऽ, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता... निमित्त होते गणेशोत्सवाच्या आनंदमयी पर्वाच्या समारोपाचे. घरोघरी आणि मंडपात विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडले. विविध घाटांवर आणि कृत्रिम तलावांवर भाविकांची गर्दी उसळली होती. उत्सव संपला असला तरी गणरायाला पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे गणेशभक्तांकडून घातले जात होते.