Pune Ganesh Visarjan 2025
Sakal
पुणे
Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रीय कला अकादमीची भव्य रांगोळी, कचरा व्यवस्थापनाचा संदेश
Pune Tilak Chowk : पुण्यातील गणेश विसर्जन मार्गावर १०० फूट रांगोळी, सामाजिक संदेश आणि ३५० कलाकारांच्या सहभागामुळे टिळक चौक कलामय आणि जागरूकतेने भारलेला दिसला.
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रीय कला अकादमीच्या सुमारे ३५० हून अधिक कलाकारांनी टिळक चौकात १०० फुटांहून अधिक लांब भव्य रांगोळी काढून विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढविली. यासाठी २५ पोती गुलाल व १५०० किलो रांगोळी वापरण्यात आली. यंदा ‘कचरा व्यवस्थापन’ हा रांगोळीचा विषय होता.

