esakal | बारामतीत कृत्रिम जलकुंभात गणेश विसर्जन करावे लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha idol immersed in an artificial water tank in Baramati

नीरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच येणार असल्याने तसेच कऱ्हा नदी पात्राचे सुशोभिकरण काम सुरु असल्याने नदीपात्रातही विसर्जन करता येणार नसल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.​

बारामतीत कृत्रिम जलकुंभात गणेश विसर्जन करावे लागणार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने केलेल्या कृत्रीम जलकुंभामध्ये नागरिकांनी विसर्जन करावे, असे आवाहन आज नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, मुख्याधिकारी किरणराज यादव, आरोग्य सभापती कुंदन लालबिगे यांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नीरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच येणार असल्याने तसेच कऱ्हा नदी पात्राचे सुशोभिकरण काम सुरु असल्याने नदीपात्रातही विसर्जन करता येणार नसल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. प्रदूषणमुक्त वातावरण व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नगरपालिकेने निश्चित केलेल्या कृत्रिम जलकुंभात विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  लहान मुले व वयोवृध्दांनी विसर्जनासाठी घराबाहेर न पडण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  त्याची यादी खालील प्रमाणे. 

-   धो. आ. सातव शाळा, जगताप मळा
-   बा.न.प. शाळा क्रमांक 2, कसबा
-   महात्मा फुले समाज मंदीर, पानगल्ली
-   क्षत्रियनगर समाजमंदीर, टकार कॉलनी
-   बा.न.प. शाळा क्रमांक 3, सिध्देश्वर गल्ली
-   श्री छत्रपती शाहू हायस्कूल, पाटस रोड
-   आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल
-   बा.न.प. शाळा क्रमांक पाच, शारदा प्रांगण
-   म.ए.सो. विद्यालय
-   रमाई माता भवन, टेलिफोन ऑफिस समोर
-   मूक बधीर शाळा, कारभारी नगर, कसबा, 
-   जि.प. प्राथमिक शाळा शारदानगर
-   चिंचकर शाळा, सपनानगर
-   जि.प. प्राथमिक शाळा, तांदुळवाडी
-   जि.प. शाळा जळोची क्षेत्रीय कार्यालयाशेजारी
-   सूर्यनगरी, मंडई शेजारी अंगणवाडी
-   कविवर्य मोरोपंत शाळा, श्रीरामनगर, 
-   देसाई इस्टेट जि.प. शाळा
-   ढवाण वस्ती, शाळा, मोरगाव रोड
-   रयत भवन मार्केट यार्ड शेजारी
-   गावडे हॉस्टिपलशेजारी, देवळे इस्टेट कार्यालय
-   रयत भवन मार्केट यार्ड
-   राजगड हाईटस, गाळा क्रमांक 4 व 5 फलटण रोड
-   जि.प. शाळा जुनी सातववस्ती, माळेगाव रस्ता
-   जि.प.शाळा रुई
-   विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, रुई ग्रामीण रुग्णालयाशेजारी.
-   तीन हत्ती चौक

भामा आसखेड आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा; मोठा संसर्ग होण्याची शक्यता