esakal | Pune : गणेश मूर्ती विसर्जनलां फिरत्या हौदाची साथ
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : गणेश मूर्ती विसर्जनलां फिरत्या हौदाची साथ

Pune : गणेश मूर्ती विसर्जनलां फिरत्या हौदाची साथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : पुणे महानगरपालिकेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाच्या वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प फिरते हौद रथाची सोय करण्यात आली आहे. तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्र निर्माल्य संकलन केंद्र ठिक ठिकाणी उभारण्यात आलेले असल्याने पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी नदी प्रदूषण न करता फिरत्या हौदात गणेश मुर्तीच्या विसर्जनाला नागरिकां कडून भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

काही ठिकाणी मूर्ती संकलना केंद्रावर गणेश भक्तांना कडून मूर्ती दिली जात आहे. विसर्जन ठिकाणी गर्दी पासुन दूर राहणार्‍या गणेश भक्तांसाठी पालिकेकडून अमोनियम बायकार्बोनेट पावडर दिली जात आहे. घरच्या घरी पाण्याच्या बादलीमध्ये ती पावडर टाकून मूर्ती विसर्जन केले जात आहे. वरील सर्व सुविधा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिली जात असल्याने या वर्षी नागरिकां कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

विसर्जन हौदाचे ठिकाण :

 • दर्गा विहीर ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चंदननगर, शहाची विहीर चंदननगर ,खुळेवाडी विहीर चंदननगर .

 • छत्रपती शिवाजी महाराज उद्यान वडगावशेरी, सनसिटी समोर

 • संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोहगाव

 • संत तुकाराम जिल्हा परिषद प्रशाला बस स्टॉप जवळ लोहगाव

 • प्रभाग निहाय व गणेश मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य संकलन केंद्र . कै.बाबू गेनू खेसे शाळा बर्माशेल /स्वच्छ संस्था

 • कै.बाबू जगजीवन राम शाळा

 • शाळा क्रमांक 150 /स्वच्छ संस्था

 • सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर शाळा रामवाडी/ स्वच्छ संस्था.

 • संत गोरोबा शाळा ,विमाननगर /स्वच्छ संस्था

 • सोमनाथ विद्यालय / स्वच्छ संस्था

 • कै.राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी गावठाण / स्वच्छ संस्था

 • आपले घर शाळा क्रमांक 150 /स्वच्छ संस्था

 • गणपतराव थिटे विद्यालय, थिटे वस्ती / स्वच्छ संस्था

 • बहुउद्देशीय हॉल दिनकर पठारे वस्ती / स्वच्छ संस्था

 • गणेश मंदिराजवळ कल्याणीनगर / स्वच्छ संस्था

 • लोकमान्य टिळक विद्यालय मनपा शाळा क्रमांक 49/ स्वच्छ संस्था

 • साईनाथनगर भाजी मंडई जुना मुंढवा रोड /स्वच्छ संस्था

 • लोणकर शाळा /स्वच्छ संस्था

 • संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोहगाव/ स्वच्छ संस्था

 • संत तुकाराम जिल्हा परिषद प्रशाला बस स्टॉप जवळ लोहगाव /स्वच्छ संस्था .

 • विष्णुजी शिकोजी सातव हायस्कूल, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन / स्वच्छ संस्था

loading image
go to top