काय सांगता? पुण्यात मिळणार चक्क कागदाचे गणपती

ganesha idol made of shadu clay and paper pulp will be available in Pune
ganesha idol made of shadu clay and paper pulp will be available in Pune

पुणे : शहरात आता कागदापासून तयार केलेले पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध होणार आहे. 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट'तर्फे या गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाडूची माती व कागदी लगद्यापासून बनलेली मजबूत व आकर्षक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा उपक्रम हातकागद संस्थेबरोबरच पेणच्या गणेशमूर्ती कारागिरांना देखील उभारी देणारा ठरेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात 'हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट' गेली 80 वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. मधल्याकाळात संस्था बंद असली तरी, आता नव्या जोमाने तोच वारसा जपण्यास सज्ज झाली आहे. जुनी परंपरा व नवा सर्जनशील दृष्टीकोन यांचा मेळ साधत आता ही संस्था कार्यरत आहे. हस्तोद्योग, शाश्वत व पुनर्वापर या तत्त्वावर आधारित या गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. 

यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती, म्हैसुरी, पद्मासनातील, पेशवाई, चौरंगावरील अशा विविध प्रकारातील, आकर्षक रंगसंगतीत व विविध उंचीच्या गणेशमूर्ती कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर जवळील हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध आहेत. या सर्व मूर्ती शाडूची माती व कागदी लगदा यांच्या मिश्रणातून बनविण्यात आल्या असल्याने त्या टक्के पर्यावरणपूरक व मजबूत आहेत. 

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

या मूर्ती बनवताना व विक्रीसाठीही स्वच्छता व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. गणेशभक्तांना व्हिडीओ कॉलद्वारे मूर्ती विषयीचे शंकानिरसन करून मूर्ती निवडता येणार आहे. या बरोबरच मूर्ती घरपोच देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. शिवाय इच्छुकांना प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटला जाऊन देखील मूर्ती खरेदी करणे शक्‍य आहे. येथे पर्यावरणपूरक मूर्तीबरोबरच पर्यावरणपूरक मखर देखील उपलब्ध आहेत. आकर्षक, टिकावू व घडी घालून पुन्हा वापरता येण्यासारखे मखर विशेष लक्षवेधी ठरत आहेत. याशिवाय अन्य सजावटीचे पर्यावरणपूरक साहित्य देखील येथे उपलब्ध आहे. 

याविषयीच्या अधिक माहिती हँडमेड पेपर्स इन्स्टिट्यूट'च्या @punehandmadepapers या पेजवर उपलब्ध आहे. 

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com