Pune News : गणेशखिंड रस्ता; उड्डाणपुलाच्या कामासाठी पर्यायी रस्त्यासाठी चाचपणी

गणेश खिंड रस्त्यावर आनंद ऋषिजी चौकातील उड्डाणपुलाच्या कामात गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार आहे.
Pune University Chowk
Pune University ChowkSakal

पुणे - गणेश खिंड रस्त्यावर आनंद ऋषिजी चौकातील उड्डाणपुलाच्या कामात गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करावी लागणार असल्याने या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून शेतकी महाविद्यालय ते रेंजहिल्स असा रस्ता प्रस्तावित केला जाणार आहे. त्यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांकडून आज (ता.९) प्रत्यक्ष पाहणी करून यावर निर्णय घेणार आहे.

शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. याच प्रकल्पाअंतर्गत पीएमआरडीएकडून विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल बांधला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून यासाठी महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम आॅगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काम देखील वेगात होणे गरजेचे असल्याने गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कमी करणे गरजेचे आहे.

यासाठी आज अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक झाली. त्यामध्ये शिवाजीनगर येथील शेतकी महाविद्यालय गेट ते रेंजहिल्स पर्यंत महाविद्यालयाच्या आतून वाहतूक वळविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावर बुधवारी (ता.१०) अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर यावर शिक्कमोर्तब होणार आहे.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘उड्डाणपुलाचे गर्डर टाकताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पर्यायी रस्त्याची आवश्‍यकता आहे. तसेच त्यामुळे आठ महिन्यात हे कामही पूर्ण करता येईल. शेतकी महाविद्यालयाची मान्यता घेण्याचे काम पीएमआरडीए करणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com