गणेशोत्सव2019 : गणपती विसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात 210 ठिकाणी व्यवस्था केली आहे. नदीपात्रातील घाटांसह कालवा, विहिरी आणि जागोजागी हौद उभारले आहेत. सर्व मिरवणूक मार्गांवर स्वागत मंडप उभारले आहेत.

गणेशोत्सव2019 : पुणे - सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात 210 ठिकाणी व्यवस्था केली आहे. नदीपात्रातील घाटांसह कालवा, विहिरी आणि जागोजागी हौद उभारले आहेत. सर्व मिरवणूक मार्गांवर स्वागत मंडप उभारले आहेत.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 12) सकाळी साडेनऊ वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. मांडव, विद्युतव्यवस्था, कॅमेरे, स्वच्छता आदी उपाययोजना केल्या आहेत. देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी नेमले आहेत. त्यात मुळा-मुठा नदीपात्रातील 18 घाटांवर 22, कालव्यावर 28 विसर्जनाची सोय आहे. त्याशिवाय सात विहिरी, 46 हौद आणि 82 पाण्याच्या टाक्‍यांची सुविधा आहे. या ठिकाणी निर्माल्य कलश, कंटेनर आहेत.

महापालिकेची व्यवस्था
विसर्जनासाठी तीन हजार अधिकारी व कर्मचारी
पावणेतीनशे सुरक्षारक्षक
अग्निशमन दल, रुग्णवाहिका, डॉक्‍टरांचे पथक
निर्माल्य कलश 255 ठिकाणी
नदीपात्रात 130 जीवरक्षक
15 क्षेत्रीय कार्यालयांकडील यंत्रणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarjan