गणेशोत्सव2019 : बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मंडळांचेही नियोजन

  • मंडळांकडून ढोल-ताशांचे वादन, विविध खेळ, तलवार बाजी, दांडपट्टा चालविणे आदी चित्तथरारक खेळ सादर होणार
  • पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूरोड, चिखली, वाकड, हिंजवडी, थेरगाव, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, कासारवाडी आदी भागांतील गणरायांचे गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन
  • भोसरीतील गणरायाचे होणार बुधवारी (ता. ११) विसर्जन

गणेशोत्सव2019 : पिंपरी - लाडक्‍या गणरायाला गुरुवारी (ता. १२) निरोप दिला जाणार असून, शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी केली आहे. आकर्षक देखाव्यांसह ढोल-ताशा पथकांकडून निरनिराळे खेळ सादर केले जाणार असून, या मिरवणुकांची गणेशभक्तांमध्ये उत्सुकता आहे. 

अशी असेल पोलिसांची तयारी
    आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा एक हजार ८३३ मंडळे
    अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त 
    महासंचालक कार्यालयाकडून मागविली अतिरिक्त कुमक 
    स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारीही राहणार कार्यरत 
    बाँबशोधक व नाशक पथक तसेच श्‍वान पथकाच्या साह्याने गर्दीच्या ठिकाणची तपासणी
    रात्री बारानंतर वादन करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई
    सुरक्षेच्या दृष्टीने टेहाळणी मनोऱ्यांची उभारणी

नदीकाठावर सुरक्षा व्यवस्था
दरवर्षी नदी पात्रातील पाण्याची कमी असते. मात्र यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा नदीच्या पात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त पाणी नदीपात्रात असल्याने भाविकांनी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासह सुरक्षेच्या विसर्जन घाटावर जीवरक्षक, अग्निशामक दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.

चिंचवडमधील मिरवणूक
    मिरवणुकांमध्ये मंडळांकडून देखाव्यांचे नियोजन
    चिंचवड स्टेशन, मोहननगर, काळभोरनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी भागांतून निघणार मिरवणुका
    थेरगाव घाट व मोरया घाटावर गणरायांचे विसर्जन
    चिंचवडगावातील चापेकर चौकात मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात

पिंपरीतील मिरवणूक 
    पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातील नदी घाटावर नेहरूनगर, संत तुकारामनगर, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प परिसरातून निघणार मिरवणुका  
    शगुन चौकात महापालिकेचा स्वागत कक्ष
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी उड्डाण पूल, शगुन चौक, कराची चौक मार्गे सुभाषनगर घाट असा असेल मिरवणूक मार्ग
    पिंपरीतील सुभाषनगर घाट, काळेवाडी घाट, पिंपरीगावातील घाटावर विसर्जनाची व्यवस्था
    मागील वर्षी चौदा तास सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका

अग्निशमन विभागही सज्ज
    प्रत्येक विसर्जन घाटावर चार ते पाच जवान, एक बोट, लाइफ जॅकेट, दोराची व्यवस्था
    राज्य अग्निशमन प्रशिक्षण संस्थेचे तीस जवान दिमतीला
  महापालिकेच्या क्रीडा विभागाचे दहा जीवरक्षक राहणार तैनात
     पिंपरी चौक, चिंचवडमधील चापेकर चौकासह ठिकठिकाणी सूचना फलकांची उभारणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Ganpati Visarjan Preparation