पुण्यात विघ्नहर्त्याचे आगमन

Ganesh-Murti
Ganesh-Murti

कोथरूड - गणेशभक्तांची आतुरता शिगेला पोचली असलेला गणेशोत्सव सोहळा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेण शहरातून गणेशमूर्तींच्या पहिल्या गाडीचे पुणे शहरात आगमन झाले आहे.

पौड रस्त्यावरील आनंदनगरमधील गणेश मूर्ती विक्रेते सुबोध महाजन यांच्याकडे गणरायाच्या मूर्तींचे सर्वप्रथम आगमन झाले आहे. ६ इंच ते २ फूट उंचीच्या मूर्तीसाठी ५०० रुपये ते २५०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमती व वाहतूक खर्चामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या किमती सुमारे ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. शहरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना अधिक पसंती असते. त्यामुळे पेणहून शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते.

या वर्षीही शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांनी पेणेमधील कारखान्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली आहे; मात्र गणेशमूर्तींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 

लालबागचा राजा, पुणेरी पगडी, टिळक पगडी यासारख्या प्रसिद्ध गणेशमूर्तीही छोट्या आकारामध्ये तयार केल्या आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्तींचे आगमन होणार आहे.

याबाबत बोलताना विक्रेते सुबोध महाजन म्हणाले, ‘शाडू मातीमध्ये टिळक पगडी, पुणेरी पगडी यासारख्या प्रसिद्ध मूर्ती तयार करण्यात आल्याने नागरिकांचा या गणेशमूर्तींना अधिक पसंती मिळत आहे. आमच्याकडे केवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची विक्री करण्यात येते. यातील अनेक मूर्ती अमेरिका, युरोप या ठिकाणी पाठवण्यात येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com