Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Khambatki Ghat Traffic Jam : गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पाच तासांचा प्रवास तब्बल दहा तासांवर पोहोचला आहे.
Pune Kolhapur Highway Traffic jam khamtaki ghat

Pune Kolhapur Highway Traffic jam khamtaki ghat

esakal

Updated on

Maharashtra Traffic Update : गणेशोत्सवासाठी कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगावकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात आज वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा येथील जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एका लेनमधून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com