esakal | पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Water_Pollution

एसएसपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन आणि ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस यांच्यात सामंजस्य करार

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरीकरण, कारखानदारीमुळे होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी मैला शुद्धिकरण केंद्राचे काम सक्षमपणे होणे गरजेचे आहे. त्यासाठी या केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एसएसपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन आणि ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि. यांच्यात बुधवारी (ता.४) सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

यंदा आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिलं गिफ्ट

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसएसपीयू रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष फिलिप बेल, भारतातील संचालक दत्तात्रय देवळे, गिरीश काळे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, आदी यावेळी उपस्थित होते. 

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या मनुष्यबळासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेणे या करारामुळे शक्य होणार आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतर गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. यापुढील काळात पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या चांगल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. 

मनसे प्रवेशाबाबत भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणतात...​

ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष फिलिप बेल म्हणाले, "ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस ही संस्था प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये जगातील नामांकित संस्था आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्था, विविध कंपन्यांच्या एचटीपी केंद्रात काम कर्मचार्यांना, तसेच पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाशी निगडीत विद्यार्थी, प्राध्यापक यांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षण घेता येईल. यातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top